Published On : Tue, Nov 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई; नंदनवन परिसरातून आरोपीकडून बंदुकीसह जिवंत काडतूस जप्त

Advertisement

नागपूर : शहरातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मध्यरात्री कारवाई करत नंदनवन परिसरातून एका आरोपीला अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूसासह ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई 11 नोव्हेंबर रोजी रात्री 00.10 वाजेपासून पहाटे 1.55 वाजेदरम्यान नंदनवन हद्दीतील जे.एल. चतुर्वेदी कॉलेजच्या मागील भागात करण्यात आली.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य उर्फ चिंटू रामकृष्ण डांगरे (वय 35, रा. घर क्र. 1444, न्यू नंदनवन लेआउट, नागपूर) या आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांना एक मॅगझिनसह अग्निशस्त्र (किंमत ₹50,000), एक जिवंत काडतूस (₹1,000) आणि मोबाईल फोन (₹10,000) असा एकूण ₹61,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस ठाणे नंदनवन, अप. क्र. 570/25, कलम 3/25 आर्म्स अ‍ॅक्ट सह 135 बीपी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement

ही कारवाई गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात एपीआय नन्नावरे, महिला हेड कॉन्स्टेबल आरती, एनपीसी सेसरा राऊत, पीसी अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वसने आणि कुणाल बोधखे यांचा समावेश होता.

Advertisement
शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate

CCTV ने खोला ऑटो चालक का राज! #Nagpur #NagpurNews #Crime #AutoDriver #CCTV #TheftCase #PoliceAction

CCTV ने खोला ऑटो चालक का राज! #Nagpur #NagpurNews #Crime #AutoDriver #CCTV...

नागपुर के स्कूल में दर्दनाक हादसा! #NagpurNews #SchoolNews #Student  #NewsUpdate #Investigation

नागपुर के स्कूल में दर्दनाक हादसा! #NagpurNews #SchoolNews #Student #NewsUpdate #Investigation

भंडारा बंद को मिला व्यापक जनसमर्थन #vidarbhanews #bhandara #newsupdate #maharashtranews

भंडारा बंद को मिला व्यापक जनसमर्थन #vidarbhanews #bhandara #newsupdate #maharashtranews

राष्ट्रपति के नाम सौंपा गया ज्ञापन #vidarbhanews #gadchiroli #vidarbha #vidarbha #newsupdate

राष्ट्रपति के नाम सौंपा गया ज्ञापन #vidarbhanews #gadchiroli #vidarbha #vidarbha #newsupdate

शेगांव में कांग्रेस का बड़ा प्रदर्शन! #Shegaon #Buldhana #Congress #NEET #StudentProtest #newsupdate

शेगांव में कांग्रेस का बड़ा प्रदर्शन! #Shegaon #Buldhana #Congress #NEET #StudentProtest #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges