Published On : Fri, Jul 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ९३८ स्कूल वाहनांवर कारवाई ; योग्यता तपासणीविना धावत होत्या रस्त्यावर !

Advertisement

नागपूर : शाळा सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅन योग्यता तपासणीविना धावत असल्याचा प्रकार जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत उघडकीस आला. त्यानंतर १० ते १३ जुलै दरम्यान शहरात आरटीओ व वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना नियम मोडणाऱ्या ९३८ वाहनांवर कारवाई केली.

आरटीओकडून कारवाईसाठी पाऊले उचलण्यात येत असून दोन पथके तयार करण्यात आली आहे. तर वाहतूक पोलिसांकडूनही शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या संख्येने भरारी पथके तैनात करण्यात आले आहे. आरटीओकडून गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे ४८ ऑटोरिक्षा व खासगी वाहने आणि ३३ स्कूलबस आणि स्कूलव्हॅनवर कारवाई केली गेली. त्यापैकी ७० वाहने जप्त करण्यात आली. या सगळ्यांकडून सहा लाखांहून अधिक दंड आकारण्यात आला.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील चार दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी २०१ ऑटोरिक्षा, ४०६ स्कूलबस आणि २५० स्कूलव्हॅनवर कारवाई केली. या सगळ्यांकडून ३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील ही कारवाईत पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) चेतना तिडके, प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर) राजाभाऊ गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
Advertisement