Published On : Mon, Dec 9th, 2019

मोरभवन, गांधीपुतळा, मनपा मुख्यालयातील 37 उपद्रवींवर कारवाई

– उपद्रव शोध पथकाकडून कामगिरी

नागपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनपाच्या उप्रदव शोध पथकाच्या कारवाईने शहर अस्वच्छ करणा-या उपद्रवींना चांगलीच धडकी भरली आहे. संविधान चौक, सीताबर्डी येथे कारवाईनंतर शनिवारी (ता.7) आणखी 37 उपद्रवींवर कारवाई करण्यात आली आहे. मोरभवन, गांधीपुतळा आणि मनपा मुख्यालयामध्ये धरमपेठ, मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ व मंगळवारी झोन पथकाकडून तीन वेगवेगळ्रया ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाकडून मोरभवन परिसरातील उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. मोरभवन परिसरात थुंकणा-या 4 व परिसरात कचरा टाकणा-या 13 अशा एकूण 17 उपद्रवींवर कारवाई करून 2100 रूपये दंड वसूल करण्यात आले.

मंगळवारी झोनच्या पथकाकडून गांधीपुतळा चैकातील थुंकणा-या 7, उघड्यावर लघवी करणा-या 1, परिसर अस्वच्छ करणा-या 1 आणि परिसरात कचरा टाकणा-या 4 अशा एकूण 13 उपद्रवींवर कारवाई करीत 2700 रूपये दंड वसूल करण्यात आले.

याशिवाय उपद्रव शोध पथकाकडून सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय परिसरातही कारवाई करण्यात आली. मनपा मुख्यालय परिसरातील थुंकणा-या 3 व परिसरात कचरा टाकणा-या 4 अशा एकूण 7 उपद्रवींवर 1000 रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.

तिन्ही कारवायांमध्ये थुंकणा-या एकूण 14, उघड्यावर लघवी करणा-या 1, परिसर अस्वच्छ करणा-या एकूण 1, परिसरात कचरा टाकणा-या एकूण 21 अशा तिन्ही ठिकाणच्या एकूण 37 उपद्रवींवर कारवाई करीत 5800 रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement