Published On : Thu, Mar 15th, 2018

प्रशासन आणि सहकाऱ्यांच्या समन्वयातून कार्य करणार : लहुकुमार बेहेते

नागपूर: प्रशासन आणि शासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. दोघांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधून आणि सहाकाऱ्यांची सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन मनपा अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहेते यांनी केले.

गुरूवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील अग्निशमन विभागाच्या परिसरात आयोजित पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, समिती उपसभापती व उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, मावळते सभापती संजय बालपांडे, मावळते उपसभापती प्रमोद चिखले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, विधी विशेष समिती सभापती धर्मपाल मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण विशेष समितीचे सभापती दिलीप दिवे, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, समिती सदस्य निशांत गांधी, वनिता दांडेकर, वंदना भुरे, आयेशा उईके, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना लहुकुमार बेहेते म्हणाले, पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यावर पूर्णपणे खरा उतरण्याचा मी प्रयत्न करीन. अग्निशमन व विद्युत विभागाअंतर्गत शासनाद्वारे जो निधी उपलब्ध होईल त्याचा विनियोग उत्तमरीत्या करीन, असेही ते म्हणाले.


यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, अग्निशमन विभाग हा मनपातील अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. त्या समितीसाठी जबाबदार व्यक्ती नेमणे गरजेचे आहे. लहुकुमार बेहेते हे प्रामाणिक आणि विश्वासू आहेत. त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आणि कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुनील राऊत यांनी केले. यावेळी नगरसेविका सोनाली कडू, मिनाक्षी तेलगोटे, प्रमोद तभाने, लखन येरावार, श्रीपाद बोरीकर, अग्निशमन स्थानक अधिकारी यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement