Advertisement
नागपूर : कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने अटक केली आहे. प्रितपालसिंग उर्फ प्रित गुरूचरणसिंग बागल (वय 28 वर्ष,मिनीमात्ता नगर,कळमना) असे आरोपीचे नाव आहे.
अवैधरित्या घरघुती वापराच्या तसेच व्यावसायिक उपयोगाच्या सिलेंडरचा साठा करून आरोपी स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता सिलेंडर मधील गॅस मशीनच्या सहाव्याने दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरून त्याची विकी करत होता.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे घरघूती/व्यवसायिक लहान व मोठे असे एकूण 59 सिलेंडरसह 3,11,500 रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कळमना पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.