Published On : Sun, Sep 6th, 2020

जळगाव जिल्हा कारागृहातुन पलायन केलेला आरोपी बोईसर पोलिसांच्या ताब्यात

नागपुर/बोईसर – जळगाव कारागृह येथून आरोपी गौरव विजय पाटील व त्याचे दोन साथीदारासह जेल गार्ड यास पिस्तुलाचा धाक दाखवून पळुन गेले होते.त्याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाणे ,जळगाव येथे आरोपीत यांचे विरूद्ध गु.र.नं ८१/२०२० भ.दं.वि.सं.कलम ३०७,१२०,२०१,३५३,२२४,२२५,सह आर्म एक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हयातील आरोपीत यांचे शोधाकारीत जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर आव्हान केले होते. त्याअनुषंगाने गुप्त बातमी कडून सदर गुन्ह्यातील आरोपी गौरव विजय पाटील हा बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहिती आधारे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर आरोपीत याचा शोध घेवून सापळा रचून आरोपी विजय पाटील वय 21 वर्षे रा. तांबापुर,ता.अमळनेर, जि.जळगाव यास ताब्यात घेवून सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव जिल्हा यांना देऊन जळगाव पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नाईक व त्यांचे स्टाफ ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई श्री दत्तात्रय शिंदे,पोलीस अधीक्षक,पालघर यांचे सूचनेप्रमाणे श्री. विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री विश्वास वळवी,उपविभागीय पोलिस अधिकारी, बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री.प्रदीप कसबे, प्रभारी अधिकारी बोईसर पोलीस ठाणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पाहवा/विनायक मर्दे, पोशि अश्फाक जमदार ,पोशि वैभव जमदार, पोशि संतोष वाघचौरे, पोशि देवा पाटील यांनी केली आहे

दिनेश दमाहे( 9370868686 )