Published On : Thu, Mar 18th, 2021

विनयभंग प्रकरणातील आरोपीस अटक

कामठी:-, मैत्रीचे रूपांतर प्रेमात करून मैत्रिणीचा विनयभंग करणाऱ्या तरुण आरोपीस जुनी कामठी पोलिसांनी अटक केली असून दिपक आनंदराव भोने वय 32 राहणार वार्ड नंबर सावरखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती असे अटकेतील आरोपी चे नाव आहेत

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिपक आनंदराव भोने वय 32 राहणार वार्ड नंबर 3 सावरखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती याने जगीदारगुट्ट , जिल्हा रंगारेड्डी हैदराबाद राज्यातील 32 वर्ष महिलेसोबत मैत्री ,मैत्रीचे रूपांतर प्रेमात करून तिचे मोबाईल फोनद्वारे फोटो व अलशील व्हिडिओ तयार करून तिला सतत त्रास देऊ लागला त्यामुळे तिने आरोपी दिपक आनंदराव भोणे विरोधात पोलीस स्टेशन जगीदारगट्टा, जिल्हा रंगारेड्डी ,हैदराबाद राज्यात आठ दिवसापूर्वी तक्रार केली होती त्यानुसार हैदराबाद पोलिसांनी कलम 354 (ड) नुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक रवींद्र रेड्डी यांनी तपासाला सुरुवात केली असता आरोपी दीपक आनंदराव भोने चा मोबाईल वरून आरोपी जुनी कामठी पोलीस ठाण्याचे हद्दीत असल्याचे माहिती होताच पोलीस निरीक्षक रविंद्र रेड्डी यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशनला बुधवारी ठाणेदार विजय मालचे यांची भेट घेऊन सदर आरोपी बद्दल माहिती दिली

ठाणेदार विजय मालचे यांनी त्वरित दखल घेत सायबर सेलच्या माध्यमातून आरोपी दिपक आनंदराव भोने विषयी माहिती काढली असता तो जुनी कामठी पोलीस ठाण्यात हद्दीत असल्याची माहिती पोलीस पथकाच्या माध्यमातून बुधवारी रात्री 9 वाजता सुमारास आरोपी दिपक आनंदराव भोने यास अटक करून त्याचे जवळून पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला आरोपी दिपक आनंदराव भोणे विरोधात मोर्शी पोलिस स्टेशन जिल्हा अमरावती ठाण्यात चोरी व इतर गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले आहेत आरोपीला अटक करून हैदराबाद राज्यातील पोलीस निरीक्षक रविंद्र रेड्डी यांच्या स्वाधीन केले आरोपीला अटक यांची कामगिरी जुनी कामठीचे ठाणेदार विजय मालचे, सहायक फौजदार तगराज पिल्ले, हेडकॉन्स्टेबल गयाप्रसाद वर्मा ,महेश कठाने ,पंकज कांबळे ,उपेंद्र आकोटकर , स्वाती चेटुले ,सुचित गजभिये ,शैलेश यादव यांच्या पथकाने केली

संदीप कांबळे कामठी