Published On : Sat, Sep 21st, 2019

आडका गावातील वाहनचालकाचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस अटक

Advertisement

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या आडका येथील रहिवासी पाण्याच्या टँकर चालकाच्या खिशातुन बळजबरीने मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीस अटक करण्याची यशसवी कारवाही दुपारी साडे बारा दरम्यान नवनिर्मित वाठोडा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बापू ढेरे व पथकांनी केले असून अटक आरोपीचे नाव सुरज दशरथ मेश्राम वय 24 वर्षे रा खरबी रोड नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी विलास रामचंद्र दुबे वय 32 वर्षे रा आडका हे पाण्याचे टँकर चालवीत असताना त्यांच्या शर्टाच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल एका अज्ञात आरोपिताने बळजबरीने खेचून पळ काढला यासंदर्भात फिर्यादीने विरोध दर्शविला असता अज्ञात आरोपिने फिर्यादी सोबत झटापट करून पळ काढला यानुसार पीडित फिर्यादीने स्थानिक नवनिर्मित वाठोडा पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 392 अनव्ये गुन्हा नोंदवीत अवघ्या काही वेळेतच आरोपीला अटक करून त्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाईल असा एकूण 27 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करन्यात आला.

Gold Rate
26 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,37,900/-
Gold 22 KT ₹ 1,28,200/-
Silver/Kg ₹ 2,28,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही यशस्वी कारवाही परिमंडळ क्र 4 चे पोलीस उपायुक्त निर्मालादेवी, एसीपी विजय धोपावकर यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, सहाययक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, पो हवा राधेश्याम, आशिष, मंगेश, देवकुमार, दीपक आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement