Published On : Thu, Aug 22nd, 2019

रेल्वेगाडीच्या धडकेने इसमाचा अपघाती मृत्यु

कामठी :-स्थानीक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलांब नगर जवळील रेल्वे मार्ग क्र 1115/2578मार्गावर कन्हान हुन नागपूर कडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहक रेल्वे गाडीच्या धडकेने रेल्वे रूळ ओलांडत असलेल्या एका इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव संजय मनोहर मेश्राम वय 35 वर्षे रा सैलाब नगर कामठी असे आहे.

प्राप्त माहिती नुसार सदर मृतक तरुण हा विवाहित असून अचानक काल मध्यरात्री शौचविधी साठी घराजवळ असलेल्या रेल्वेरुळ ओलांडून जात असता सदर घटनास्थळ मार्गे कन्हान हुन नागपूर कडे कामठी रेल्वे मार्ग जात असलेल्या मालवाहक रेल्वे गाडीच्या धडकेने घडलेल्या गंभीर अपघातात जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी, बी आर ठाकूर, शैलेश मेश्राम यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करोत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement