Published On : Tue, Oct 29th, 2019

दिवाळीच्या पूर्वदिनी शालेय कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यु

कामठी:-नागपूर हुन आपले खाजगी कामे आटोपून रामटेक कडे जात असलेल्या मनसर येथील एका शालेय कर्मचाऱ्याच्या दुचाकी ला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने दिलेल्या धडकेतून। घडलेल्या गंभीर अपघातात अपघाती मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना दिवाळी पूर्वी 26 ऑक्टोबर ला सायंकाळी साडे सहा दरम्यान घडली असून मृतक शालेय कर्मचाऱ्यांचे नाव महेंद्र हिरामण बोरकर वय 53 वर्षे रा परसोडा शितलवाडी मनसर असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महेंद्र हिरामण बोरकर हे मनसर येथील स्थायी रहिवासी असून रामटेक येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे प्रयोगशाळा सहाययक पदावर कार्यरत आहेत .दिवाळीच्या पूर्व दिनी मृतक हे हिरो डिलक्स क्र एम एच 40 ए ए 4488 ने सायंकाळी साडे पाच वाजता निघून नागपूर हुन खाजगी कामे आटोपून रामटेक कडे येत असता नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र वरील रामटेक-मनसर टोल नाक्याजवळ मागेहुन भरधाव वेगाने येणाऱ्या रोहिणी ट्रॅव्हल्स क्र एम पी 20 पी ए 8001 च्या चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जख्मि झाला तर ट्रॅव्हल चालकाने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले.

Advertisement

घटनेची माहिती टोल नाक्यावर मिळताच टोल कर्मचाऱ्यांनी मदतीची धाव घेत जख्मि दुचाकीस्वार महेंद्र बोरकर ला पुढील उपचारार्थ कामठी येथिल शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र जख्मि ची प्रकृति चिंताजनक असल्याने इस्पितळात पोहोचताच जख्मि ने दम सोडला व जगाचा कायमचा निरोप घेतला. मृतकाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement