Published On : Mon, Aug 14th, 2017

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघात, 5 गंभीर जखमी

लोणावळा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर खोपोली परिसरात भीषण कार अपघात झाला आहे. भरधाव येणारी ही इको कारनं रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

भीषण अशी धडक बसल्यानंतर गाडीतील एक महिला वगळता अन्य सर्व जण गाडीतच अडकले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खोपोली पोलीस, आर्यन देवदूत बचाव पथक, आयआरबी व डेल्टाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

बचाव पथकानं गाडीचा पत्रा कापून सर्व जखमींना बाहेर काढले व उपचारांसाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement