| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 16th, 2018

  नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार, तीन जखमी

  नागपूर: नागपूर-अमरावती महामार्गावर वडधामनाजवळ एका कंटेनरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिका कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीररित्या जखमी झाला आहे. बाजारगाव भागातील हॉटेल शहेनशहाजवळ हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला. अमरावतीकडून नागपूरकडे येत असलेली ही कार समोर जाणाऱ्या ट्रकवर आदळली होती.

  या अपघातात विशाल रतवानी (२५), सत्या सिंग (२२), दिव्या पखू (२३), निशा निकम (२२) हे जागीच ठार झाले. यातील निशा निकम ही नागपूर शहरातील क्राईम ब्रॅन्चमधील पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम (एनडीपीसी) यांची कन्या आहे. नागपूरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी तात्काळ पोहचले असून तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145