| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 16th, 2018

  मंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

  मुंबई: मंत्रालयासमोर वृद्ध महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सखुबाई विठ्ठल झाल्टे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.

  सुखबाई झाल्टे यांना पोलिसांनी तातडीने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

  सखुबाई विठ्ठल झाल्टे या 60 वर्षी असून, त्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील राहणाऱ्या आहेत.

  गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु असलेल्या कारणामुळे त्या मंत्रलयात फेऱ्या मारत होत्या. मात्र अनेक अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुनसुद्धा काम होत नसल्याने, त्यांनी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान मंत्रलयासमोर औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145