Published On : Sat, Oct 13th, 2018

शिप्ट कार व मोटार सायकल अपघातात आठ जखमी

Advertisement

कन्हान : – रामटेक येथे प्रशिक्षणास जाणा-या शिक्षकांच्या कार व मोटार यायकल अपघातात आठ जखमी झाले . शुक्रवार (दि.१२) ला सकाळी १० वाजता दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वराडा बंद टोल नाक्याच्या जवळ रामटेक येथील ञानदिप कॉन्व्हेंट मध्ये इयत्ता १० वी च्या मराठी विषयाच्या प्रशिक्षणास शिक्षकांच्या शिप्ट कार क्र एम एच ४० ए सी ५४५३ च्या समोर जाणाऱ्या हिरोहोंडा मोटारसायकल क्र एम एच ४० आर ४५२१ ला वाचविण्याकरिता कार चाकलकाने ब्रेक मारली असता अनबँलेस होऊन रोड च्या बाजुला असलेल्या दगडाला धडक लागुन कार पलटल्याने कार चालक चुंगेश्वर मुरारी नाकतोडे , सौ संगिती चुंगेश्वर नाकतोडे, दयानंद महादेव बुरेवार, मिंलीद वानखेडे , केशव श्रीरामे जन किरकोळ जखमी तर मोटारसायकल खाली पडुन चालक रामगोविंद बच्चालाल यादव, पत्नी , मुलगी दिव्या वय ६ वर्ष जखमी झाले तर मुलगा सुर्याश वय ३ वर्ष यास डोक्याला मार असल्याने चौधरी दवाखाना कामठी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . कन्हान पोलीस स्टेशनचे पो उप निरिक्षक प्रल्हाद धवड पुढील तपास करीत आहे .

वराडा बंद टोल नाक्याच्या जवळ दुसऱ्या दिवशीही अपघात. वराडा बंद टोल नाका येथील महामार्ग पोलीस चौकी असताना सुध्दा जवळपास अपघात झाल्याचे त्याना माहीत नसते . महामार्गावर अपघात झाल्यास हे पोलीस उशिरा पोहचत असते.

Gold Rate
20 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,200/-
Gold 22 KT ₹ 1,22,900 /-
Silver/Kg ₹ 2,03,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या चौकी समोर २९ जुन २०१८ ला याच जागेवर गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुंवर यांची कार थांबवुन हत्या करण्यात आली . तेव्हाही कुठलीही कामगिरी बजावली नाही.

फक्‍त सकाळी वाहने थांबवुन वसुली करण्यात तरबेज दिसतात. या चौकीपासुन जाणारे अवैध जनावरांचे , चोरीच्या वस्तुचे वाहने कन्हान कामठी ला पकडली जातात . परंतु आज पर्यंत एकही वाहन पकडल्याचे दिसुन आले नाही . यामुळे ही महामार्ग पोलीस चौकी व कर्मचारी कुचकामी , निष्कामी ठरत आहे .

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement