
नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराच्या २०२५-२६ या कार्यकाळासाठीची नवी कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीत प्रा. अभय मुदगल यांची पुन्हा एकदा महानगर अध्यक्षपदी निवड झाली असून वीरेंद्र पौणीकर यांची महानगर मंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके उपस्थित होत्या. निर्वाचन अधिकारी प्रा. भागवत भांगे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली, तर नागपूर विभाग संघटन मंत्री देवाशिष गोतरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.
गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा माजी महानगर मंत्री कु. दुर्गा भोयर यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषण प्राचार्य डॉ. अभय मुदगल यांनी केले, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी नवनिर्वाचित मंत्री वीरेंद्र पौणीकर यांनी पार पाडली.
घोषित कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून प्रा. मेधा कानेटकर आणि डॉ. संदीप लांजेवार, तर सहमंत्री म्हणून रविकांत दुबे, वैष्णवी पांडे, पवन वर्णम् आणि पेजल भुरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यालय मंत्री म्हणून अर्चीस केळकर, महानगर व्यवस्था प्रमुख डॉ. सुनील फुडके, तर प्रांत कार्यालय व्यवस्था प्रमुख म्हणून विशाल सादमवार व लिमेश नाईकवार यांची निवड झाली. मिडिया संयोजक साक्षी पांडे, सोशल मिडिया संयोजक संकेत खडतकर, छात्रकार्य प्रमुख खुशबू कानफाडे आणि विविध विभागीय संयोजक, प्रमुख अशा जबाबदाऱ्याही नव्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या घोषणेनंतर सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात नव्या कल्पना आणि उपक्रम राबवण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.
या वेळी प्रमुख अतिथी पायल किनाके म्हणाल्या, “अभाविप नागपूर महानगराची ही नवी टीम विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्यरत राहील आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा मला विश्वास आहे.










