Published On : Mon, Jun 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

अबू आझमी अन् भाजप एकाच नाण्याचे दोन पैलू; ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संतापले

Advertisement

नागपूर: समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्या वारकरी समाजावर केलेल्या वादग्रस्त विधानावर सर्वत्र टीका होत आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली अबू आजमी आणि भाजप ह्यांना एकाच नाण्याचे दोन पैलू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले, अबू आझमी आणि भाजप हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. हे निश्‍चित आहे की अबू आजमी एक मुद्दा उचलतात आणि भाजप हिंदू-मुस्लिम वाद भडकवते. अबू आजमी हे भाजपच्या इशाऱ्यावरच हे विधान देत आहेत. हे माझे स्पष्ट आरोप आहेत.

काँग्रेस नेत्यांनी पुढे सांगितले, अबू आझमी कोणाच्या दबावाखाली हे विधान करीत असतील, मात्र मला असे वाटते की त्यांचे हे वक्तव्य वारकरी समाजाच्या संदर्भात दिले गेले आहे. हे जाणूनबुजून हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उभे करण्यासाठी करण्यात आले आहे, जे फक्त भाजपच्या फायद्यासाठी आहे.

दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. यात ते म्हणाले की, आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.