Published On : Mon, Dec 20th, 2021

प्री-कास्ट उद्योगात फ्लाय-अॅशचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याची क्षमता – नितीन गडकरी

Advertisement

फ्लाय अॅशच्या वापरावर ग्रीन अॅशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन 2021 या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
फ्लाय ऍश निर्यात करण्याऐवजी तिचा स्थानिक वापर केल्यास कार्बन फूटप्रिंट्स कमी होतील – सुधीर पालीवाल

नागपूर – वीज निर्मिती प्रकल्पांनी फ्लाय ऍश डंपिंग बंद करावे. त्याऐवजी फ्लाय ऍशचा वापर प्री-कास्ट उद्योगात केला पाहिजे, ज्यामध्ये फ्लाय त्याचा पुरेपूर उपयोग केला जाऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लाय अॅशच्या वापरावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद ग्रीन अॅशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन 2021 च्या समारोप कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. ग्रीन अॅश फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, नागपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

गडकरी पुढे म्हणाले की, अभियांत्रिकी संस्थांनी पुढे येऊन रस्ते आणि इतर बांधकामांसाठी प्री-कास्ट पॅनेलला प्रोत्साहन दिले पाहिजे कारण यामुळे बांधकामाचा खर्च आणि प्रदूषणही कमी होते. फ्लायओव्हर्सचे लांब प्रीकास्ट बीम बनवण्यासाठी स्टील फायबरचा वापर करणाऱ्या मलाशियामध्ये वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाचीही त्यांनी माहिती दिली. यामुळे दोन पिलर्समधील अंतर वाढते आणि बांधकाम खर्च कमी होतो. अशा प्रकल्पांमध्ये फ्लाय ऍशचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे शक्य आहे ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ बनते. त्यांनी फ्लाय ऍशच्या वापराशी संबंधित फायद्यांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जेणेकरून त्याचा वापर वाढेल आणि रोजगार निर्मितीला मदत होईल.

केंद्रीय मंत्र्यांनी या क्षेत्रात हाती घेतलेल्या व्यवहार्य उपक्रमांना पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे आणि वापरकर्त्यांसाठी फ्लाय ऍशचा वापर फायदेशीर करण्यासाठी अधिक काम आणि संशोधन अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. फ्लाय अॅशच्या वापराबाबत जागरूकता आणण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल गडकरी यांनी ग्रीन अॅशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन 2021’चे संयोजक सुधीर पालीवाल यांचे अभिनंदन केले.

राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थितांसामोर आपले विचार मांडले आणि फ्लाय ऍशच्या वापराला चालना कशी देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. फ्लाय अॅश उपक्रमांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

सुधीर पालीवाल म्हणाले की, फ्लाय ऍश निर्यात करण्याऐवजी, उपचार करून स्थानिक पातळीवर त्याचा वापर केला पाहिजे, या मुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. तसेच ते म्हणाले की , फ्लाय ऍश मध्ये अल्युमनिया, सिलिका, मॅग्नेटाइट, टायटॅनियम डाय ऑक्साईड असे विविध दुर्मिळ घटक असतात. जे काढले आणि वापरले जाऊ शकतात, त्यामुळे ते एक मौल्यवान संसाधन म्हणून संरक्षित केले पाहिजे ज्याला भविष्यात मोठी मागणी असेल. कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करणार्‍या फ्लाय ऍशच्या वापरासाठीच लागू असेल अश्या फ्लाय ऍश वाहतूक अनुदान सुधारण्याची त्यांनी मागणी केली.

बिपीन श्रीमाळी, आयएएस, सीएमडी, एमएएचए पीआरईआयटी , यांनी फ्लाय ऍश क्लस्टरची स्थापना आणि ग्रीन कॉंक्रिटला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सांगितले. मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीही त्यांनी स्पष्ट केल्या. एमएएचए पीआरईआयटी सध्या वेस्टर्न कोल फील्ड, महानिर्मिती, आय आय टी रूरकी इत्यादींशी एकाच वेळी राख वापर आणि रोजगार निर्मितीचे मॉडेल तयार करण्यासाठी सहकार्य करत आहे असे ते म्हणाले.

समापन सत्रापूर्वी, विविध सत्रे झाली ज्यात बीबीसी मराठी चे प्रवीण मुधोळकर यांनी ‘फ्लाय-अॅश विषयी जागरूकता- प्रसारमाध्यमांच्या भूमिका ‘ यावर भाष्य केले. व्हीएम मोटघरे, संचालक, एमपीसीबी यांनी फ्लाय ऍश आणि प्रदूषण या विषयांवर, महाजेनकोचे कार्यकारी संचालक डॉ नितीन वाघ यांनी फ्लाय ऍशच्या फायदेशीर वापरावर भाष्य केले. सुधीर पालीवाल यांनी 2017 पासून आयोजित अशाच कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

स्वागत व आभार प्रदर्शन मिलिंद पाठक, अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (आय) नागपूर यांनी केले.