Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Mar 4th, 2019

  अभ्यंकर नगर,माधव नगर,डागा लेआऊट व कॉर्पोरेशन कॉलनी येथील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण

  नागपूर: प्रभाग क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या अभ्यंकर नगर,माधव नगर,डागा लेआऊट व कॉर्पोरेशन कॉलनी येथील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रभागातील जेष्ठ नागरिक नानाजी आकरे व नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांच्या हस्ते पार पडले.यावेळी नगरसेवक अमर बागडे,नगरसेविका रुतीका मसराम,अभ्यंकर नगर गार्डन क्लब चे अध्यक्ष नरेश पाटील प्रामुख्याने उपस्तिथ होते.

  या परिसरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण उखडल्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले होते.त्यामुळे यारस्त्यांनी रहदारी व मार्गक्रमण करतांना नागरिकांना फार त्रास होत होता.या परिसरातील रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांच्या कडे केली.नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांनी नागरिकांची समस्या एकूण घेतली व प्रत्यक्ष या रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांना आश्वस्त केले कि या रस्त्यांची सुधारणा लवकरच करण्यात येईल.या परिसरातील विकास कामे करण्यासंदर्भात नागसेविका डॉ.परिणिता फुके यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेतली व यापरिसरतील विकास कामे करण्याकरिता निधीची मागणी केली तसेच या कामाकरिता सतत पाठपुरावा केला व निधी मंजूर करून आणला.

  आज या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण कामाचे विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले. छोटेखानी झालेल्या समारंभात कार्यक्रमाचे संचालन सविता रेलकर यांनी केले तर आभार वर्मा काका यांनी मानलेत.यावेळी राम मुंजे,रिटायर्ड जज सीरियाजी,रहाळकर काका,शेंडे काका,दहशास्त्र काका,राजन हर्जात,ज्योती मुदलियार,विजय चौरे,हिरु चौधरी,अनुप शेवते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145