Published On : Mon, Mar 19th, 2018

अभय गोटेकर यांनी स्वीकारला पदभार

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापतीपदी नगरसेवक अभय गोटेकर यांची अविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. १९) पदाचा कार्यभार स्वीकारला.

आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी सभापती अभय गोटेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पदग्रहण समारंभाला महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके, परिवहन समितीचे माजी सभापती नगरसेवक बाल्या बोरकर, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या उपसभापती उषा पॅलट, सदस्य निरंजना पाटील, लता काडगाये, रुतिका मसराम, दुर्गा हत्तीठेले यांच्यासह रिता मुळे उपस्थित होते.


महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभय गोटेकर यांचे स्वागत केले. गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी नवनियुक्त सभापती अभय गोटेकर पुढाकार घेतील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केला. मनपाचे कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर यांनीही यावेळी सभापती अभय गोटेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.