Published On : Sun, Aug 9th, 2020

विजदरवाढ विरोधात ‘आप’ चा पालकमंत्र्यांच्या कार्यलयासमोर ठिय्या

नागपुर– लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ करण्यात यावे व एप्रिल पासून लागू केलेली विजदरवाढ मागे घेण्यात यावी या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्री व ऊर्जामंत्री मा. नितिन राउत यांच्या बेजनबाग स्थित कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. ‘नागपुरच्या जानतेचा ऊर्जामंत्रीना आवाहन, आपण वाढीव वीजबिल भरू नका’, ‘लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे’ या आशयाचे फलक आंदोलनात झळकत होते.

‘वीज बिल माफ करा, अन्यथा खुर्ची खाली करा’, ‘वीज दरवाढ मागे घेतलीच पाहिजे’, ‘अवाजवी दरवाढ करणाऱ्या वीज कंपन्यांचा धिक्कार असो’, ‘नागरिकांची आर्थिक कुचंबणा करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो’ ,’२०० यूनिट विजबिल माफ ज़लेच पाहिजे’ नशे नारे लोकांनी लावले.

लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून विजबिलांमधील दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले होते.

तसेच आम आदमी पार्टीच्या वतीने लॉकडाउन काळातील प्रतिमहिना 200 युनिट वीजबिल माफ व्हावे या मागणीला पाठिंबा म्हणून नागरिकांनी जवळपास १०००० विजबिल व अर्ज माननीय मुख्यमंत्र्यंना दयासाठी जमकेले.

परंतु या सगळ्या आंदोलनांची कोणतीच दखल अद्याप राज्य शासनाने घेतली गेलेली नाही. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे समोर दिसत असताना देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोणताही दिलासा दिला जात नाही आहे. त्यामुळे नागपूरचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री त्यांनी सद्यपरिस्थितीची जाणीव करून ही मागणी स्विरली पाहिजे.

“जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही व वरील मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नागरिकांनी बिले भरू नयेत असे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्या करण्यात आल्या:

1. लॉकडाउन काळातील प्रति महिना 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे.

2. विजबिलांची स्लॅब दरवाढ रद्द झालीच पाहिजे.

3. वीजबिलातील वाढीव वहन आकार रद्द झालाच पाहिजे.

4. लॉकडाउन काळातील वीजबिल ज्या ग्राहकांनी भरले आहे त्यांच्या बिलांच्या रक्कमेतील फरक पुढील बिलातून वजा केला पाहिजे.

या मागण्यांची पूर्तता पुढील एका आठवड्यात करून राज्य शासनाने सामान्य नागरिकांना व वीज ग्राहकांना दिलासा देऊन त्यांची आर्थिक कुचंबणा थांबवावी. अन्यथा, आम आदमी पार्टीला हे आंदोलन नाईलाजासत्व तीव्र करावे लागेल याची नोंद घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी विधर्भ सयोजक व राज्य समिति सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्षय जगजीत सिंह, अमरीश सावरकर, अशोक मिश्रा, कविता शिंगल, शंकर इंगोले, डॉ अजय पीसे, आकाश कावळे, नीलेश गोयल, प्रभात अग्रवाल, सुरेश बरगड़े, रोशन डोगरे, विकास घरड़े, अलका पोपटकर, जय चौवान, आकाश काले, बालू बंसोड़, सचिन पारधी, निखिल मंडावडे, नेहल बारेवार, मनोज डफरे, सुरेश खर्चे , नंदू पाल, सचिन लोनकर, गजानन मायर, चंद्रशेखर धोबल, ईश्वर गजबीये , मनोज वरगट, रवींद्र गिधोडे ,जीतू मुत्कूरे , नितिन रामटेके, शारुख शेख, शुशांत बोरकर, राकेश अम्बडे, राकेश कोबरागड़, संजय जिवतोड़े आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ऊर्जामंत्रीनी निवेदन स्विकारले नही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.