Published On : Thu, Mar 5th, 2020

आप दक्षिण नागपूर तर्फे महलक्ष्मी नगरच्या नाल्याच्या बांधकामाला गती मिळण्यासाठी उपायुक्त हनुमान नगर झोन यांना निवेदन

लकडगंज झोनमध्ये ३९ तक्रारींवर सुनावणी

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोनमध्ये बुधवारी (ता. ४) महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौरांनी नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करीत त्यांचे समाधान केले. आलेल्या तक्रारींवर सुनावणी करीत महापौरांनी सात दिवसात तक्रारींवर कार्यवाही करण्याचा निर्देश दिले.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहू (सेलोकर), नगरसेवक दिपक वाडीभस्मे, शेषराव गोतमारे, नगरसेविका चेतना टांक, कांता रारोकर, जयश्री रारोकर, सरिता कावरे, मनीषा धावडे, मनीषा अतकरे, निरंजना पाटील, प्रभारी उपायुक्त महेश मोरोणे, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते.

लकडगंज झोनच्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर सुनावणी करीत महापौरांनी सात दिवसात तक्रारींवर कार्यवाही करण्याचा निर्देश दिले. प्रत्येक तक्रारकर्त्यांशी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्तिगत संवाद साधला.

जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी अतिक्रमण संदर्भात होत्या. याव्यतिरिक्त नवीन गडर लाईन टाकणे, गडर लाईन बदलविणे, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणे, ओपन प्लॉट पॉलिसी, रोडचे डांबरीकरण करणे, नगरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणे, वाढीव संपत्ती कर अशा विविध विषयांवर नागरिकांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या.

तक्रारकर्ते विजयजी व्यास यांनी सरदार वल्लभभाई पटेल मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात ट्रक चालकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार केली. महापौर संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त यांना पत्र पाठविण्यास सांगितले व लवकरात लवकर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यास सांगितले. जनता दरबारात संबंधित विभागाचे अधिकारी आणि तक्रारकर्ते नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement