Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात इथेनॉल मिश्रणाविरोधात ‘आप’चे आंदोलन; गडकरी निवासाकडे मोर्चा रोखला, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

Advertisement

नागपूर : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नागपुरात मंगळवारी आम आदमी पक्षाने जोरदार आंदोलन छेडले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना आधीच अडवत त्यांना ताब्यात घेतले.

महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुपारी आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र आले. हे ठिकाण गडकरी यांच्या निवासस्थानापासून सुमारे १५० मीटर अंतरावर असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत गडकरी निवासाच्या दिशेने मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वैयक्तिक विरोधात नसून, पेट्रोलमध्ये इथेनॉलची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक भूषण ढाकुलकर यांनी स्पष्ट केले.

आंदोलनामुळे महाल परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. बाजारपेठेचा भाग असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. एकीकडे वाहतूक सुरळीत ठेवणे आणि दुसरीकडे आंदोलकांना नियंत्रणात ठेवणे, अशी दुहेरी जबाबदारी पोलिसांवर आली होती. अखेर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisement

दरम्यान, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल (E20) मिश्रणाच्या धोरणाला देशातील काही वाहनधारक संघटनांकडून विरोध होत आहे. २०२३ पूर्वीच्या वाहनांमध्ये E20 इंधन वापरल्यास इंजिनवर परिणाम होणे, मायलेज कमी होणे आणि देखभाल खर्च वाढण्याची शक्यता असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे इथेनॉल-मुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.