Published On : Mon, Sep 7th, 2020

आम आदमी पार्टी चा नागपुरात ऑक्सी मीटर अभियान

नागपुर – मागील काही महिन्यांपासून आपल्या शहरांत कोव्हीड-१९ महामारीचा प्रकोप सुरू आहे. आज दिवसेंदिवस महामारीचा प्रकोप मोठया प्रमाणात सुरू आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक मा. मुख्यमंत्री श्री. अरविंदजी केजरीवाल, दिल्ली ह्यांची भारतातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले होते की सर्व शहरात वस्त्यांमध्ये ऑक्सीमीटर ह्या छोट्याशा यंत्रणेने प्रत्येक व्यक्तीचे ऑक्सीजन लेव्हल, आणि प्लस रेट मोजण्या ची सोय करण्यात यावी त्या दृष्टीने ह्या अभियाना अंतर्गत एखाद्या व्यक्तीचे ऑक्सीजन लेव्हल ९४ च्या खाली असल्यास आणि प्लस रेट कमी असल्यामुळे त्याला तातडीने औषधी उपचार लवकर मिळणे गरजेचे असते त्या दृष्टीने ” ऑक्सीमित्र अभियान ” दरम्यान कोरोना योध्याची त्यांच्या सुरक्षेकच्या दृष्टीने ऑक्सीजन लेव्हल आणि प्लस रेट मोजून तपासणी करण्यात आली.

जगभर गाजलेला हा प्रभावी प्रयोग आता आम आदमी पार्टी तर्फे नागपूर शहरा मध्ये सर्व पोलीस स्टेशन मधील सर्व कोरोना योध्यांच्या सुरक्षतेसाठी ऑक्सिजन तपासणी करून पोलिस स्टेशन ला ” ऑक्सीमीटर” प्रदान करण्याची सुरुवात करण्यात आली आहे, यादरम्यान काल नागपूर मधील इमामवाडा पोलीस स्टेशन, सक्करदरा पोलीस स्टेशन, कपिल नगर पोलीस स्टेशन ला ऑक्सिजन लेव्हल तपासणी करून ऑक्सिमिटर प्रदान करण्यात आले.

“ऑक्सीमीटर भेट अभियान” हे संपूर्ण देश्यामध्ये तसेच देश विदेशात आप पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राबवित आहे. तसेच अनेकांना त्याचा लाभ होतांना दिसतो आहे. ह्या अभियाना मध्ये पक्षाचे विधर्भ युवा आघाड़ी संयोजक पीयूष आकरे, युवा आघाड़ी राज्य समिति सदस्या कृतल वेलेकर, पूर्व नागपुर युवा आघाडी संयोजक प्रतीक बावनकर व अनेक सदस्य सहभागी झालेत.