नागपूर : शहरातील प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका सलूनमध्ये हेयर वॉश करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनेंद्र काशीराम सराटे (वय ५०, रा अहिल्या नगर) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
स्वलंबीनगर येथील फोर सीझन्स फॅमिली सलूनमध्ये 21 वर्षीय तरुणी हेयर वॉश करण्यासाठी गेली.
पण सलूनच्या कर्मचाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर फेस पॅक लावत तिच्या चेहऱ्याची मालिश करून देत असल्याचे सांगितले.
नंतर आरोपीने तिची छेड काढण्यात सुरुवात केली.ज्यामुळे तरुणीला अस्वस्थ वाटले.तिने प्रताप नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून तपास सुरू केला आहे.