Published On : Tue, May 19th, 2020

वर्षभरा नंतर दहावीच्या मुलीं आई वडिलांना भेटल्या

अन.. वसतिगृहाच्या मुली शुकरूप घरी पोहोचल्या

कन्हान : परीक्षा पाहता विद्यार्थी साठी मार्च महिना महत्वाचा असतो. पूर्ण वर्ष मेहनत करून ते परीक्षा देतात आणि परीक्षा नंतर मन मोकडे करून अनेक स्वप्न, आशा त्यांचा मनात वाहणाऱ्या लाटा म्हणून प्रवाह करतात मात्र २०२० हा वर्ष विद्यार्थीच्या मनावर वेगडच छाप सोडून जाणार आहे. व हाच प्रकार मार्च महिन्यात सुरू झालेल्या लोकडाऊन नंतर वसतिगृहात राहणाऱ्या १० वि च्या विद्यार्थी बरोबर घडला आहे.

कोविड-१९ च्या महामारी पासून वाचविण्याच्या ड्रीष्टीकोणातून अचानक देशात लॉकडाउन लविण्यात आले ते लागल्यापासून अनेक मजूर, कामगार, विध्यार्थी, सह इतर प्रवाशी नागरिक विविध जागी अडकून राहिले. अश्यात विकट स्थिती पाहता घरवाल्यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. हीच आठवण गेल्या काही महिन्या पासून मन आतुर करीत होती कन्हान-कान्द्री वसतिगृहात राहणाऱ्या ज्योती सिंगराम, सुमरवती वरकडे, रितू उईके, ज्ञानो परते, दशोदा काकोडीया, रशीम सोयाम, रंजिता उईके, आरती पुंडे, आराधना कुंभरे, कीर्ती परते, राजकुमारी पावले, निशा मडावी, सरस्वती सोयाम, कसिया उईके,
या १४ विध्यर्थिनी. मध्यप्रदेशच्या शिवणी, जबलपूर भागात राहणाऱ्या या मुली १० वि चा वर्ष असल्याने गेल्या वर्ष भरा पासून घरी गेल्या नोव्हत्या आणि भूगोलचा पेपर लोकडाऊन मुडे न झाल्याने ते वस्तीगृहातच राहायला विवश होत्या. वसतिगृहात त्यांची सर्व सोय करण्यात आली होती. मात्र त्यांना आपल्या घरी ज्यायचे होते शासनाने गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बस सेवा नुकताच सुरू केल्या आहे.

व बस सेवाचा लाभ घेण्यासाठी आरोग्य तपासणी व परवानगी घेणे आवश्यक आहे. या सर्व बाबी साठी वसतिगृहच्या अधिक्षक मीना अंबादे यांची मदद केली सामाजिक कार्यकर्ते रोहित मांनवटकर यांनी. १८ मे रोजी मुलींना पारशिवनी तहसिलदार वरून कुमार साहारे, मंडळ अधिकारी मेश्राम,व पटवारी मंडळी, यांच्या देख रेख मध्ये कन्हान येथून बस मध्ये रवानगी करण्यात आली खवासा बॉर्डर ला मुलींची पुन्हा आरोग्य तपासणी झाली व तेथून मध्यप्रदेशातील बस ने घरी नेण्यात आले त्यांचे आई वडील त्यांची वाट बघत होते मुलींना पाहून ते आनंदित झाले आणि मुली घरी शुकरूप पोहोचल्याचा समाचार त्यांनी फोन वर दिला. सहकार्य अमोल मेश्राम, नितिन मेश्राम,रॉबिन नीकोसे यांनी केले.