नागपूर : शहरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने समितीच्यावतीने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात आज सकाळी २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ चे पठण एकाचवेळी २५ हजार हून अधिक विद्यार्थांनी सादर करण्यास सुरुवात केली. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक पठण करण्याच्या या घटनेची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे. या उपक्रमात नागपुरातील १७५ शाळांचे २८ हजार ३२९ व १२१५ शिक्षक सहभागी झाले होते.
‘वंदेमातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने यावेळी विद्यार्थी वंदेमातरम् गीताचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरीसह इतर मान्यवर उपस्थित आहेत. तसेच कार्यक्रमात ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया’ चे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित आहेत.
दरम्यान या कार्यक्रमाचे संयोजक विजय फडणवीस व अनिल शिवणकर असून कामडे, योगेश बन, किशोर बागडे, केवटे व राजू कनाटे यांचेसह महाराष्ट्र शासनाचे शिक्षक विभाग, महानरपालिकेचा शिक्षण विभाग, शाळांचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभत आहे.