कन्हान : – शहर युवा सामाजिक कार्य कर्ता व्दारे महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिवसी कार्यक्रमासह भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहिद चौक तारसा रोड कन्हान येथे कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार, पुष्प वाहुन दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक हयानी २१ नोव्हेंबर १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढाई विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांयां व नागरिकांनी पुष्प अर्पित करून २ मिनीट मौनधारण करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात शहिद वीर जवानाना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंजनिश मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन चंदन मेश्राम यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता अमोल साकोरे, अखिलेश मेश्राम, प्रशांत मसार, सचिन यादव, अमोल राऊत, शैलेश शेळकी, मनीष वैद्य, सुरेश कळंबे, नितिन मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण , मुकेश गंगराज, प्रकाश कुर्वे, प्रविण गोडे, सोनु खोब्रागडे, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.