Published On : Fri, Nov 15th, 2019

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती निमित्य कांद्री ला आदरांजली अर्पण

कन्हान : – ब्रिटिशाच्या जुलमा विरोधात रणशिंग फुकणारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती ग्राम पंचायत कार्यालय कांद्री येथे आदरांजली अर्पण करून साजरी करण्यात आली.

शुक्रवार (दि.१५) ला ग्राम पचायत कार्यालय कान्द्री येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे सरपंच बळवंत पडोळे, रेल्वे समिती सदस्य महेंद्र भुरे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे यांच्या हस्ते पुजन व पुष्पहार अर्पण करून आदरांज ली वाहिली.

याप्रसंगी मान्यवरांनी क्रांति सूर्य बिरसा मुंडा यांनी देशाला स्वतंत्र मिळवुन देण्या करिता दिलेल्या योगदाना बद्दल गौरवास्पद मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राहुल टेकाम हयानी तर आभार प्रदर्शन बैशाकु जनबंधु यांनी केले.

यावेळी सरपंच बळवंत पडोळे, उपसरपंच श्याम कुमार बर्वे, माजी सरपंच व सदस्या आशाताई कनोजे, सदस्या दुर्गाबाई सरोदे, वर्षाताई खडसे, रेखाताई शिंगणे, ग्रा.पं. सदस्य धनराज कारेमोरे, शिवाजी चकोले, बैसाखु जनबंधु, प्रकाश चाफले, राहुल टेकाम, महेश झोडावने, रवि पंधरे, अभिजित चांदूरकर, गणेश सरोदे, रजनीश मेश्राम, वाशुदेव कुशराम, ग्रा. वि.अधिकारी दिनकर इंगळे, कर्मचारी वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी प्रामुख्याने उपस्थित होते.