Published On : Thu, Oct 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एकूण 417 आपली बस तब्बल 13 दिवसांनी धावली रस्त्यावर

Advertisement

नागपूर : पगारवाढीच्या मागणीसाठी आपली बस चालक-वाहकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून संप सुरू केला होता. 13 दिवसांनंतर बुधवारी 417 आपली बसेस शहरात धावल्या. बसेस पूर्ण क्षमतेने धावल्याने शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

राज्य सरकारने पगारवाढीचा जीआर जारी केल्यानंतर आंदोलक कामावर परतले. संबंधित जीआर संपूर्ण राज्यासाठी लागू झाला.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उल्लेखनीय आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील महापालिका आपली बस कंत्राटी कामगार संघ, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन आणि लाल बावटा वाहनतुक कामगार युनियनने वेतनवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला होता. एकदिवसीय संपाची घोषणा करण्यात आली.

एक दिवसाच्या संपानंतर लाल बावटा वाहनतुक कामगार युनियनचे चालक आणि वाहक कामावर परतले. मात्र उर्वरित दोन संघटनांनी संप सुरूच ठेवला.

नवरात्री आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाला विशेष बसेस चालवता आल्या नाहीत. परिवहन प्रशासक गणेश राठोड यांनी सांगितले की, बुधवारपासून शहरात 417 बसेस धावल्या. दोन्ही आंदोलक संघटनांनी आज सामीलपत्र दिले. पगारवाढीबाबत कायदेशीर मत घेतले जात आहे. तरीही पगारवाढीचा निर्णय बसचालकांनाच घ्यावा लागणार आहे. यात महापालिकेची कोणतीही भूमिका नाही.

Advertisement