Advertisement
नागपूर : नागपूर विमानतळावर शॉर्टसर्किटमुळे एका हॉटेलला आग लागली. आग पाहताच सर्वत्र घबराट पसरली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नागपूर विमानतळावर झिरो माईल कॅफे नावाचे हॉटेल आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास कॅफेमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने धूर निघाला. काही वेळातच आगीने रुद्र रूप धारण केले.
यावेळी विमानतळ प्रवाशांनी खचाखच भरला होता. घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.
विमानतळाला आग लागल्याची माहिती मिळताच नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटांतच आग पूर्णपणे आटोक्यात आली. मात्र या घटनेत कॅफेमध्ये ठेवलेली गॅस भट्टी, कपाट, ओव्हन, ग्रिलर, फ्रीज आदी साहित्य जळून राख झाले.