Published On : Tue, Nov 14th, 2023

नागपुरातील कापड व्यावसायिकाची अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या !

Advertisement

नागपूर : अंबाझरी तलावात एका कापड व्यावसायिकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिनेश भंवरलाल जैन (३५) रा. कपिलनगर चौक, नारी रोड, असे मृताचे नाव आहे.

Advertisement

माहितीनुसार, जैन यांचे कपड्यांचे दुकान आहे. त्यांची पत्नी गृहिणी असून त्यांना एक मुलगी आहे. शनिवारी सायंकाळी दिनेश घरून निघाले. पत्नीला बजाजनगर येथे राहणाऱ्या मावशीकडे जात असल्याचे सांगून सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते मावशीकडे न जाता अंबाझरी तलाव परिसरात पोहोचले. काही वेळ काठावर उभे राहिल्यानंतर अचानक तलावात उडी घेतली. परिसरातील उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना तलावातून बाहेर काढले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिनेश यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.