नागपूर: नागपूरच्या पारडी परिसरातील भंडारा रोडवरील आर्य मोटरसमोर साखरेने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे.सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. या भीषण आगीत ट्रक पूर्णपणे जाळून खाक झाल्याची माहिती आहे. या ट्रकच्या मागील भागासोबतच साखरेवर झाकलेली ताडपत्रीही जळून खाक झाली.
अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आली.
यासोबतच, लकडगंज अग्निशमन केंद्रातून मदतीसाठी एक वाहनही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे वृत्त अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.