Published On : Tue, Sep 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भरधाव कारची दुचाकीला धडक,उड्डाण पुलावरून खाली पडल्याने एक गंभीर तर एकाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव आलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वारचा पुलाखाली पडून मृत्यू पावला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्दीराम टी पॉईंटजवळ ही घटना घडली असून अद्यापही मृत युवकाची ओळख पटली नाही. या अपघातामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक जवळपास अर्धा तास खोळंबली होती.

माहितीनुसार, दोन युवक दुचाकीने (एमएच ३१ सीई ६३६६) काटोल रोडवरून सदरकडे जात होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उड्डाण पुलावरून जाताना हल्दीराम टी पॉईंटजवळ राँग साईडने भरधाव आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकी जवळपास १०० मीटरपर्यंत घरसटत गेली. त्यानंतर पुलाच्या कठड्याला धडकली. सुरक्षा भिंतीला धडक बसल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीच्या मागे बसलेला युवक उड्डाण पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कारचालकाला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement