Published On : Fri, Sep 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चांदीची महालक्ष्मी, राजेशाही अलंकार अन् २९८ वर्षांचा वारसा;नागपूरच्या भोसले घराण्याची अनोखी परंपरा!

Advertisement

चांदीची महालक्ष्मी, राजेशाही अलंकार अन् २९८ वर्षांचा वारसा;नागपूरच्या भोसले घराण्याची अनोखी परंपरा!

नागपूर : नागपूरच्या भोसले राजघराण्याची ओळख केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीतूनही हा ऐतिहासिक वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. महाल परिसरातील सिनियर भोसला पॅलेस येथे दरवर्षी साजरा होणारा गौरी-महालक्ष्मी पूजन सोहळा याच परंपरेचे जिवंत उदाहरण आहे. तब्बल २९८ वर्षांपासून ही परंपरा जपली जात असल्याचे सांगितले जाते.

इसवी सन १७२८ मध्ये नागपूर राज्याचे संस्थापक सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांच्या काळात या महालक्ष्मी पूजेची सुरुवात झाल्याचे मानले जाते. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, मात्र पूजेचे पारंपरिक स्वरूप आणि श्रद्धा आजही कायम असल्याचे राजे मधोजी भोसले यांनी सांगितले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पूजेचे खास आकर्षण म्हणजे चांदीची महालक्ष्मीची मूर्ती. पूजेच्या वेळी राजघराण्याकडील पारंपरिक आणि ऐतिहासिक अलंकारांनी देवीला सजवले जाते. त्यामुळे या सोहळ्यात धार्मिक श्रद्धेसोबतच भोसले घराण्याचा राजेशाही वारसा आणि सांस्कृतिक वैभवही पाहायला मिळते.

याच ऐतिहासिक परंपरेविषयी नागपूर टुडेने राजे मधोजी भोसले यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महालक्ष्मी पूजेची परंपरा, चांदीच्या मूर्तीचे महत्त्व, राजघराण्यातील अलंकार आणि पिढ्यान्‌पिढ्या जपला जाणारा हा वारसा याबाबत माहिती दिली.

Advertisement

ज्येष्ठा गौरीच्या आगमनानिमित्त भोसले राजघराण्याच्या या पारंपरिक महालक्ष्मी पूजेकडे भाविक आणि इतिहासप्रेमींचे विशेष लक्ष असते. जवळपास तीन शतकांचा हा वारसा आजही श्रद्धा, परंपरा आणि राजेशाही संस्कृतीची आठवण करून देतो.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.