नागपूर : गोकुळपेठ मार्केटमधील 40-50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना नागपूर महानगरपालिका (NMC) कडून दुकाने एक महिन्यात रिकाम्या करण्याचा नोटिस प्राप्त झाला आहे.
NMC आणि नागपूर सुधार प्राधिकरण (NIT) एक मल्टीस्टोरी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी करत आहेत, ज्यासाठी अंदाजे 1100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हे प्रकल्प गोकुळपेठ मार्केटमधील दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रक्लपाला बनायला जवळपास ४ वर्षाहून अधिकचा कालावधी लागू शकतो. मात्र तोपर्यंत आम्ही कुठे जाणार? असा सवाल येथील दुकादारांनी ‘नागपूर टुडे’शी बोलतांना उपस्थित केला आहे.
आमच्या पोटापाण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. तसेच आमच्या दुकानात काम करणारे अनेक कामगार बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचेही येथील दुकानदारांचे म्हणणे आहे.
NMC चा दावा आहे की, या नव्या प्रकल्पात जुन्या दुकानदारांना पुनः जागा दिली जाईल, परंतु दुकानदारांना त्यांच्या व्यवसायाच्या भवितव्याबाबत चिंता आहे. त्यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून, लवकरच स्थगितीच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
गोकुळपेठ मार्केटमध्ये अनेक दुकानदार 40-50 वर्षांपासून व्यवसाय करत आहेत, त्यामुळे त्यांच्या रोजगारावर आणि भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी लागणारी आर्थिक तयारी आणि दुकानदारांचे भविष्यकालीन आराखडे कसे निश्चित होईल, हे लवकरच स्पष्ट होईल.