Published On : Sat, Aug 3rd, 2019

उमेश कामतने उलगडले एक गुपित

Advertisement

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ असे बिरुद मिळवलेला उमेश कामत नेहमी सेटवर मजामस्ती करत असतो. सेटवर खेळीमेळीचे वातावरण तयार करणाऱ्या उमेशला त्याचे सहकलाकार ‘सेट ऑफ लाइफ’ म्हणतात. त्याचे कौतुक करताना त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले नाही तर काहीच नाही. अशा या उमेशचे एक गुपित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उमेश त्याच्या बायकोला म्हणजेच प्रियाला खूप त्रास देतो. हो खरंच. एम. एक्स. एक्सक्लुझिव्हची नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज ‘आणि काय हवं’च्या सेटवर त्याची सहकलाकार आणि पत्नी असलेल्या प्रियाला वायफळ तरीही तितकीच गंमतीशीर बडबड करून उमेशने वैतागून सोडले होते.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांच्या या गंमतीमध्ये ‘आणि काय हवं’चे दिग्दर्शक वरुण नार्वेकरही सहभागी होते. उमेश आणि वरुण प्रियाला सतत सतवत असल्यामुळे प्रिया खूप चिडायची.

“प्रियाला अशा प्रकारचा त्रास देताना मला खूप मजा येते. मी सेटवरच्या बऱ्याच गोष्टींमध्ये जास्त सहभागी नसतो. मात्र प्रियाला त्रास देण्यात सर्वात पुढे असतो. ‘आणि काय हवं’च्या शूटिंगला मी प्रियाला खूप त्रास द्यायचो आणि यात आमचे दिग्दर्शक वरुण नार्वेकरही सहभागी व्हायचे. आम्ही दोघे मिळून प्रियाला अगदी त्रस्त करून सोडायचो.” असे उमेश सांगतो.

प्रेक्षकांना उमेश आणि प्रियाला स्क्रीनवर पाहायला खूप आवडते. याचे कारण म्हणजे त्यांच्यात असणारे प्रेम. ते दोघे सोबत खूप सुंदर दिसतात आणि त्यांचे एकमेकांबद्दल असणारे प्रेम नेहमीच त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होत असते. हीच सुंदर जोडी तब्बल सात वर्षांनी ‘आणि काय हवं’च्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्नानंतरच्या पहिल्यांदा घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच पहिला सण, पहिले भांडण, पहिले घर, पहिली गाडी आणि इतर अनेक गोष्टी हलक्याफुलक्या गोष्टीतून उलगडणार आहेत. तेव्हा एम. एक्स. प्लेयरवर पाहायला विसरू नका ‘आणि काय हवं’. अगदी मोफत.

Advertisement
Advertisement