Advertisement
नागपूर: शहरातील घाट रोडवरील सिल्व्हर नेस्ट हॉटेलमध्ये आज शुक्रवारी एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीचे नाव तेजस संतोष गायकवाड असे आहे, तो शताब्दी चौकातील रहिवासी होता.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. त्याने या आठवड्याच्या सुरुवातीला हॉटेलमध्ये चेक इन केले होते. तिथेच तो राहात होता.आज पहाटेच्या दरम्यान, त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले असे वृत्त आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.