Published On : Mon, Jun 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भंडाऱ्यात नवे राजकीय समीकरण! शिंदे गटाचे आमदार आणि नाना पटोले एकाच मंचावर

Advertisement

भंडारा: राजकारणात कोणताही संबंध कायमस्वरूपी नसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. भंडाऱ्यात एका मंचावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर एकत्र दिसले, आणि त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

दूध संघ निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी- ankita
जिल्ह्यातील दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन नेते एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) हे पारंपरिक विरोधी पक्ष असतानाही, सहकार क्षेत्रातील अपयशी व्यवस्थेविरोधात दोघंही एका व्यासपीठावर आले आहेत.

Gold Rate
29 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,39,100/-
Gold 22 KT ₹ 1,29,400 /-
Silver/Kg ₹ 2,49,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राजकीय नाही, सहकारी लढा – नाना पटोले यांचा खुलासा:
नाना पटोलेंनी स्पष्ट केलं की, “ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” तसेच, सहकारी बँक निवडणुकीसाठीही अशीच एकता कायम ठेवण्याची तयारी दर्शवली. नरेंद्र भोंडेकर यांनीही या युतीचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, “दूध संघाचा गैरकारभार हा संपूर्ण जिल्ह्याला अडचणीत आणणारा ठरला आहे. या अपयशी नेतृत्वाविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत.”

भविष्यातील निवडणुकांसाठी नवा संकेत?
या एकत्र येण्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही अशा अपराजित आघाड्या दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात या घडामोडींनी नवचैतन्य निर्माण केलं आहे.

राजकीय शत्रुत्व मागे टाकून सहकार क्षेत्रात हातमिळवणी-
गुवाहाटी बंडानंतर काँग्रेसकडून ‘गद्दार’ म्हणून टीका झालेल्या आमदारासोबत नाना पटोले यांचा हा मंचावरील हातमिळवणीचा क्षण म्हणजे राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाहूल देणारा ठरतो आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement