Published On : Mon, May 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीतील मॉडेल तरुणी देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात दाखल !

Advertisement

नागपूर : मनिषनगर येथील हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये सुरु असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान केली. देहव्यापारातील मोठा दलाल बंटी ऊर्फ बिलाल अहमद अली याने टिव्हीवरील जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या दिल्लीतील मॉडेल तरुणीला देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात बोलावले होते.अली याचे चित्रपट सृष्टीत आणि मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींशी संबंध आहेत.

तसेच रशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान आणि उज्बेकिस्तान येथील देहव्यापाराशी संबंधित एजन्सीसोबत संबंध आहेत. त्यामुळे तो नेहमी देहव्यापार करवून घेण्यासाठी देशविदेशातील तरुणींना नागपुरात आणत होता. मागील काही दिवसांपासून त्याने दिल्लीत टीव्ही जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या मॉडेल तरुणीला विमानाने बोलावून घेतले. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. यासंदर्भांत बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपी दलाल विशालला त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला.

आरोपी विशालने हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये ३० हजार रुपयात तरुणीला देहव्यवसायासाठी उपलब्ध करून दिले. पोलिसांनी तेथे धाड टाकून घटनास्थळावरून तरुणीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणीची चौकशी केली असता बंटी ऊर्फ बिलाल अहमद अलीने ५ लाख रुपये महिन्याच्या करारावर नागपुरात आणल्याचे सांगितले. बिलालने विशालसोबत संगनमत करून देहव्यवसाय करण्यासाठी ग्राहकांचा पुरवठा केल्याची कबुली दिली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विशाल आणि बिलाल बंटीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला. दिल्लीतील मॉडेल तरुणी देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात दाखल !नागपूर : मनिषनगर येथील हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये सुरु असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान केली.

देहव्यापारातील मोठा दलाल बंटी ऊर्फ बिलाल अहमद अली याने टिव्हीवरील जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या दिल्लीतील मॉडेल तरुणीला देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात बोलावले होते.अली याचे चित्रपट सृष्टीत आणि मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींशी संबंध आहेत. तसेच रशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान आणि उज्बेकिस्तान येथील देहव्यापाराशी संबंधित एजन्सीसोबत संबंध आहेत. त्यामुळे तो नेहमी देहव्यापार करवून घेण्यासाठी देशविदेशातील तरुणींना नागपुरात आणत होता.

Advertisement

काही दिवसांपासून त्याने दिल्लीत टीव्ही जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या मॉडेल तरुणीला विमानाने बोलावून घेतले. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. यासंदर्भांत बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपी दलाल विशालला त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. आरोपी विशालने हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये ३० हजार रुपयात तरुणीला देहव्यवसायासाठी उपलब्ध करून दिले. पोलिसांनी तेथे धाड टाकून घटनास्थळावरून तरुणीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणीची चौकशी केली असता बंटी ऊर्फ बिलाल अहमद अलीने ५ लाख रुपये महिन्याच्या करारावर नागपुरात आणल्याचे सांगितले. बिलालने विशालसोबत संगनमत करून देहव्यवसाय करण्यासाठी ग्राहकांचा पुरवठा केल्याची कबुली दिली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विशाल आणि बिलाल बंटीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.