नागपूर : शहरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका अभियंत्याने विवाहित महिलेला इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले.हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. विशाल देशपांडे (४४, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित ३४ वर्षीय महिला उच्चशिक्षित असून ती विवाहित आहे. तिला पती आणि एक मुलगा आहे. ती पूर्वी अहमदाबाद आणि मेरठ येथील एका मोठ्या कंपनीत नोकरीवर होती. ती मूळची नागपूरची असून सध्या ती घरूनच काम करायची आरोपी विशाल देशपांडे हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. त्याने इंस्टाग्रामवरून विवाहित महिलेला मॅसेज केला. त्याने तिच्याशी ओळखी वाढवून मैत्री केली.
दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने पतीला घटस्फोट देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र नंतर तो लग्नास टाळाटाळ करीत होता. काही दिवसानंतर महिलेला देशपांडे हा विवाहित असल्याची माहिती मिळाली. या रागातून महिलेने बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करीत देशपांडे याला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.