Published On : Mon, Apr 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्शांचे वाटप

Advertisement

नागपूर: महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ५० पात्र महिला लाभार्थींना पिंक ई-रिक्शांचे वितरण केले. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात येत असून, महिलांना सुरक्षित प्रवास व रोजगाराच्या संधी देण्याच्या हेतूने ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे.

या कार्यक्रमात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्य मंत्री मेघना सकोरे-बोर्डिकर, आमदार संदीप जोशी, आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे. ‘पिंक ई-रिक्शा’सारख्या योजनांमुळे गरजूंना रोजगार मिळतोय, तसेच कामकाजी महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी दिली जातेय. नागपूर जिल्ह्यात ५० महिलांना ई-रिक्शा वितरित करण्यात आल्या असून, पुढील टप्प्यात २ हजार महिलांना या योजनेतून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे.

महामेट्रो व महिला व बाल विकास विभागामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार, या पिंक ई-रिक्शा मेट्रो स्थानकांवर फीडर सेवा म्हणून वापरली जाणार आहे. यामुळे महिलांना नियमित उत्पन्न मिळेल. भविष्यात पर्यटन स्थळे व विमानतळांवरही या सेवांचा विस्तार केला जाणार आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील आठ जिल्ह्यांत या योजनेंतर्गत पहिल्या सहा महिन्यांत पाच हजार ई-रिक्शा वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लाभार्थी महिलांना १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, पुढील पाच वर्षांसाठी देखभाल व चार्जिंगचीही सुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिली जाईल.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुद्द एका महिला लाभार्थीच्या पिंक ई-रिक्शामधून प्रवास करून महिलांच्या आत्मविश्वासात भर घातली. त्यांच्यासोबत मंत्री तटकरे आणि मेघना सकोरे-बोर्डिकरही होत्या.

Advertisement
Advertisement