| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 15th, 2017

  एक सेल्फी आईसोबत’ला उदंड प्रतिसाद

  नागपूर: मातृदिनाचे औचित्य साधून नागपूर महानगर पालिकेने ‘एक सेल्फी आईसोबत’ या ऑनलाइन उपक्रमाचे आयोजन केले होते. आईसोबत सेल्फी पाठविण्याच्या आवाहनाला नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला.

  मनपातर्फे सुरू असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या अभियानांतर्गत सदर ऑनलाइन उपक्रम जाहीर करण्यात आला होता. व्हाटसअप आणि ई-मेल वर आईसोबत सेल्फी काढून पाठविण्याचे आवाहन मनपाने केले. रविवारी सकाळपासून सेल्फीचा ओघ सुरू झाला. महापौर नंदा जिचकार यांचा मुलगा प्रियश याने आईसोबत पाठविलेला सेल्फी सर्वप्रथम मनापाच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला.

  त्यानंतर मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी त्यांच्या आइसोबत काढलेला सेल्फी अपलोड करण्यात आला. दिवासभर हजारो नागपूरकरांनी सेल्फी पाठवून मातृप्रेम व्यक्त केले. मनापाच्या फेसबुक पेजवर दिवसभर आज आईसोबतच्या सेल्फीचीच धूम होती. अनेकांनी सेल्फीसोबत मातृदिनाचे आणि बेटी बचाओ अभियानाचे संदेशही पाठविले.  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145