Published On : Fri, Sep 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील रोकडे ज्वेलर्सच्या महल शोरूमला ग्राहकांची तुफान गर्दी

नागपूर : रोकडे ज्वेलर्सच्या महल शोरूममध्ये आजपासून सुरू झालेल्या खास उपक्रमाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विश्वासार्हता, योग्य भाव आणि उत्तम गुणवत्ता यामुळे रोकडे ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात आपली खास ओळख निर्माण केली असून, आज सकाळीच शोरूममध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली.

नव्या रुपात सजवलेल्या महल शोरूमच्या उद्घाटनावेळी पहाटेपासूनच ग्राहकांची रांग लागली होती. पारदर्शक व्यवहार, शुद्ध धातूंचा वापर आणि आकर्षक डिझाईन्समुळे रोकडे ज्वेलर्सने नागपूरसह विदर्भभरात विश्वासाचा ठसा उमटवला आहे.

रोकडे ज्वेलर्सच्या खास वैशिष्ट्यांमध्ये:

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
  • पारदर्शकता : सोन्या-चांदीच्या खरेदीत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाते, ज्यामध्ये कॅरेट मीटर सुविधा उपलब्ध आहे.
  • गुणवत्ता : २४ कॅरेट (९९५), २२ कॅरेट (९१६) सोने व ९९९ चांदीचा वापर.
  • आकर्षक डिझाईन्स : आधुनिक व पारंपरिक डिझाईन्ससह “Rare by Rokde” कलेक्शन, ज्यात हलकी व बजेट-फ्रेंडली ज्वेलरी समाविष्ट.
  • ग्राहक समाधान : हॅप्पी कस्टमर स्कीम, लॉयल्टी गिफ्ट पॉईंट्स व डिजिटल गोल्ड यांसारख्या योजना.

ग्राहकांचा वाढता विश्वास आणि नाविन्यपूर्ण ऑफर्समुळे रोकडे ज्वेलर्सला “नागपूरकरांचा दागिना” ही ओळख मिळाली आहे. आजच्या गर्दीमागे त्यांच्या नव्या ऑफर्स आणि आकर्षक कलेक्शनचाही मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Advertisement