Published On : Tue, Sep 21st, 2021

गणरायाला सावनेरवासीयांचा भावपूर्ण निरोप

Advertisement

– नगर प्रशासनाने केली कु्त्रिम जलकुंभात विसर्जनाची व्यवस्था,विसर्जन सुरळीत होण्याकरिता लाँयन्स क्लब व समाजसेवींचा पुढाकार

सावनेरः मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या गणेशोत्सवात दहा दिवस घरोघरी विराजमान गणेशाची मनोभावे पुजा अर्चना करुण आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाची लगबग अनंत चतुर्थीला दिसुन आली.दुपार पासुनच गणपती विसर्जनाला नागरिकांची गर्दी कोलार तटावर होणार याकरिता हर्षला राणे मुख्याधिकारी नगर पालीका सावनेर तसेच ठाणेदार मारुती मुळूक यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरातील गांधी चौक बाजार चौक तसेत नदी काठच्या विसर्जन स्थळावर अनेक जलकुंभ व निर्माल्य संकलन कठडे निर्माण केल्याने नागरिकांना गणेश विसर्जनास सोईचे झाले , याकरिता तहसील प्रशासन,नगर प्रशासन,पोलीस प्रशासन,लाँयन्स क्लब व अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकारा दिला ।

तसेच लाँयन्स क्लबचा उत्स्फुर्त सहभाग
शहरातच नव्हे तर आंतराष्ट्रीय स्तरावर कार्यरत लाँयन्स क्लबच्या स्थानिक पदाधिकार्यांनी नगर प्रशासनाला सहकार्य करत गांधी पुतळा येथील जलकुंभाची व्यवस्था चोखपणे हातळली.याकरिता कापसे निवासापुढे सुसज्ज असे भव्य वाटरप्रुफ पंडाल निर्माण करुण त्यात गणेश विसर्जनाचा उपक्रम राबविण्यात आला साफसफाई व स्वच्छ वातावरणात असलेल्या विसर्जन स्थळाला अनेक गणमान्यानी भेट देऊण लाँयन्स क्लबच्या पदाधिकार्यांचे उत्साहवर्धन केले तर शेकडो भावीकांनी या जलकुंभात विसर्जन करुण नगर प्रशासन व लाँयन्स क्लबच्या प्रयत्नास यशस्वी केले

याप्रसंगी वरिष्ठ भाजप नेते रामराव मोवाडे,नगर परिषदेचे उपाध्यक्ष अँड् अरविंद लोधी,वरिष्ठ शिवसैनिक उत्तम कापसे,पत्रकार दिपक कटारे,लाँयन्स क्लबचे अँड् अभिषेक मुलमुले,अँड् मनोज खंगारे,डॉ शिवम पुण्यानी,डॉ.अमित बाहेती,पीयुष झीजुवाडीया,नगर परिषद सावनेरचे धिरज देशमुख,पंकज छेनीयाँ,मधू लोई,राजु पारधी पोलीस कर्मचारी अधिकारी,आजी माजी नगरसेवक,सामाजसेवी आदींनी सहकार्य केले तर रेखाताई मोवाडे नगराध्यक्षा सावनेर,हर्षला राणे मुख्याधिकारी सावनेर, आदिंनी लाँयंस क्लबच्या पदाधिकारींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन उत्साहवर्धन केले.

– दिनेश दमाहे