Published On : Fri, Aug 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात तीन दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

तीन लाखांत केला होता सौदा

नागपूर : शहरात बाळ तस्करीच्या घटना दिवसेंदीवस उघडकीस येत आहे. गुन्हे शाखेने आणखी एका बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा छडा लावला. टोळीप्रमुख राजश्री सेन हिच्यासहसहा जणांवर गुन्हा दाखल केला. या टोळीने नवजात बाळाची गोंदीयातील एका व्यापाऱ्याला ३ लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माहितीनुसार, राजश्री सेन ही शांतीनगर येथील रहिवासी आहे. परराज्यातील व्यापाऱ्यांना नवजात बाळ विक्री करणारी टोळी चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एएचटीयू विभागाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलीस सतर्क झाले. सेनच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर होती.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राजश्री हिने पंकज कोल्हे (वय ३५), पिंकी उर्फ सुजाता लेंडे (२८, कळमना), सचिन पाटील (इंदोरा,जरीपटका), प्रिया सुरेंद्र पाटील (३५, रा.लोहगाव,पुणे) आणि छाया मेश्राम यांना बाळ विक्री करणाऱ्या टोळीत घेतले. पुण्यातील ४ मुले असलेल्या एका गरीब दाम्पत्याला प्रिया पाटील भेटली आणि एक बाळ मैत्रिणीला दत्तक देण्यासाठी तयार केले.

डिसेंबर २०१९ मध्ये दाम्पत्याला घेऊन प्रिया नागपुरात आली. राजश्री सेनने लगेच गोंदियातील निपुत्रिक असलेल्या किराणा व्यापाऱ्याशी संपर्क केला आणि ५ ते ७ लाख उकळण्याचा कट रचला. राजश्री सेनने बनावट दत्तकपत्र तयार केले आणि व्यापारी दाम्पत्याला बाळ सोपवले. त्यांना पोलिसात तक्रार देण्याची भीती घालून ३ लाख रुपये घेतले.

हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर आयुक्त संजय पाटील, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बकबककर, सुनील वाकडे, नाना ढोके, दीपक बिंदाने, मनिष पराये, अश्विनी खोडपेवार, ऋषिकेश डुंबरे आणि शरीफ शेख यांनी उघडकीस आणले.

Advertisement
Advertisement