Published On : Mon, Jul 6th, 2020

वाडीतील सत्य साई सोसायटीत आढळला चौथा कोरोना बाधीत रुग्ण

वाडी(अंबाझरी):वाडी नगरपरिषद क्षेत्रात पूर्ण प्रतिबंधनात्मक व जागृकतेची काळजी घेऊनही कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत असल्याने नागरिकासह प्रशासनात ही चिंतेचे वातावरन निर्माण झाले आहे.

नगरपरिषद प्रशासनाकडून प्राप्त माहिती नुसार सदर बाधीत व्यक्ती हा सत्य साई सोसायटीत किरायाने राहतो.काही दिवसांपूर्वी एम एस इ बी च्या विशेष पथकात नागपूरच्या ग्रुप सोबत कार्यालयीन कार्यासाठी कोकणात रायगढ येथे गेला होता.जाण्यापूर्वी त्यांने आपला परिवार गावी पाठविला होता.एक महिना नंतर सदर इसम 2 जुलाई ला आपल्या कार्यालयीन टीम सह परत आला,असे समजते की या टीम मधील एका सदस्याला कोरोना सदृश लक्षण आढळल्याने आरोग्य विभागाने त्यांची तपासणी केली असता तो बाधीत असल्याचे लक्षात आले.इकडे वाडीच्या या कर्मचाऱ्याला घरीच कोरोन्टाईन च्या सूचना दिल्या.ड्युटीवर रुजू होण्यासाठी जाताना त्यानी स्वताहाची एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली.

तपासणी नंतर सदर व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही बाब रुग्णालयाने आरोग्य प्रशासनाला कळवताच तेथून वाडी नगरपरिषद प्रशासनाला समजताच मुख्यधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी स्वास्थ निरीक्षक धनंजय गोतमारे यांना घेऊन सत्यसाई सोसायटी येथील निवासी संकुल गाठले.सफाई कर्मचारी प्रवीण नांदूरकर,प्रफुल गुडध्ये याच्या मदतीने ही इमारत आधी निर्जंतुकीकरणं केले.व या इमारतीच्या घर मालकाला या बाबतची माहिती देऊन ही इमारत सील करण्याची कार्यवाही केली.ही वार्ता या परिसरात कळताच खळबळ उडाली. आता सोमवारी आरोग्य विभाग या घर मालकांच्या कुटुंबातील सदस्यांची करोना तपासणी करणार व त्या आधारावर पुढील कार्यवाहि करणार असलयाची माहिती वाडी नप प्रशासनाने दिली.

सुरक्षा नगर येथे 2 बाधीत रुग्ण व नवणीतनगर येथे 1 रुग्ण सापडल्यानंतर हा चौथा रुग्ण सापडल्याने ही साखळी वाढत आहे.व ही साखळी तोडण्यासाठी वाडीत अधिक सतर्क व नियम पालनाची गरज असल्याचे मत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी व्यक्त केले.