नागपूर : शहरात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोरडीत घडली . याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.गोलू उर्फ हरिओम शिवदयाल सनोडिया (रा. बंडोल, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. ते कामाचा शोधासाठी नागपुरात आले होते. कोराडी परिसरात एका इमारतीचे काम त्यांना मिळाले ते त्याठिकाणीच एक झोपडी करून राहायला लागले. याच परिसरात आरोपी गोलूही राहतो.१५ एप्रिलला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने गोलू हा मुलीला झोपडीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला.
मुलगी रडत घरी आल्याने मुलीला काय झाले यांची विचारणा तिच्या आई -वडिलानी केली. पीडित मुलीला अधिक त्रास होत असताना पाहून तिच्या आई -वडिलांनी तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरने मुलीची तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. याबाबत मुलीला विचारले असता गोलूने तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. आरोपी गोलू विरोधात वडिलांनी कोराडी पोलिसांत तक्रार केली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोलूला अटक केली असून न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.