Published On : Wed, Apr 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात चोरट्यांचा धुमाकूळ; वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या, तब्बल २५ लाखांचे दागिने लंपास!

Advertisement

नागपूर : शहरात घरफोड्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांत धाडसी कारवाया करत तब्बल २५ लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शंकरपूर परिसरातील रुही पांजरी येथे राहणारे कमलाकिशोर शर्मा हे १२ एप्रिल रोजी कुटुंबासह बैतूल येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे १५ लाख रुपयांचे दागिने चोरून नेले.

Gold Rate
Apr 15 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,43,600 /-
Silver/Kg ₹ 2,56,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुसऱ्या घटनेत हुडकेश्वर परिसरातील प्रशांत गवांडे हे कुटुंबासह हैदराबाद येथे गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे ८ लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

तिसऱ्या घटनेत लोकेश अमृत हे ९ एप्रिल रोजी कुटुंबासह रायपूर येथे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घर फोडून सुमारे २ लाख रुपयांचे दागिने चोरले.

या सलग घडलेल्या घटनांमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांत गुन्हे नोंदवून तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement