Published On : Thu, Apr 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला भीषण धडक; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Advertisement

नागपूरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल मध्यरात्री भीषण अपघात घडला. पूर्ती बाजार परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या किया सोनेट कारने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना तात्काळ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,700 /-
Gold 22 KT ₹ 1,40,200 /-
Silver/Kg ₹ 2,39,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, कार चालक हा बँक व्यवस्थापक असल्याची माहिती समोर आली असून, तो दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या अपघातामुळे शहरात पुन्हा एकदा मद्यधुंद वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement