Published On : Wed, Nov 27th, 2019

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना भावपुर्ण श्रध्दाजंली

कन्हान : – एस.सी, एस.टी, एन टी, ओबीसी जनजागृती समिती महाराष्ट्र व रिपब्लिकन भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश यांच्या सयुक्त विद्यमाने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

तारसा रोड चौक कन्हान येथे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर शहिद जवानांच्या प्रतिमेला एस.सी, एस. टी, एन टी, ओबीसी जनजागृती समिती महाराष्ट्र व रिपब्लिकन भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्राम, पी. एस.आय. शेख, पोलीस कर्मचारी मेश्राम, परतेकी आदीच्या हस्ते दिप प्रज्वलित व पुष्पहार, पुष्प अर्पण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

याप्रसंगी कन्हा न शहरातील युवा कार्यकर्ता निखिल रामटेके, कैलास बोरकर, रमेश गोडघाटे , रोहित मानवटकर, उमेश बागडे, नरेश चिमणकर, रसिक गजभिये, वैशाली देवीया, सुकेशनी बागडे, कल्पना पाटील, सारिका धारगावे, श्रीमती पवनीकर, बाळु नागदेवे, अखिलेश मेश्राम, नितिन मेश्राम, पंकज रामटेके, अभिजीत चांदुरकर, महमद रॉव, महेश धोंगडे, रवी दुपारे, स्वप्निल गजभिये, राष्ट्रपाल पौनिकर, अस्सु भाई, देशभतार सह मान्यवर नागरिक उपस्थित होते.